केवळ 'या' शापामुळे रावण सीतेला स्पर्श करू शकला नाही
रावण महान विद्वान, पंडित, शूर, वीर, सर्व कलांमध्ये निपुण होता, परंतु त्याने या सर्व गुणांचा गैरवापर केल्यामुळे त्याचा उदो उदो करणे पूर्णपणे चुकीचे ठरेल. त्याने सीतेचे अपहरण करूनही तिला वासनेने स्पर्श केला नाही, असा चुकीचा समज करून घेतला जातो. परंतु त्यामागचे सत्य जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्याचे कारण उत्तरकांड मध्ये सापडते. वाल्मिकी रामायणाच्या उत्तरकांडमध्ये २६ व्या अध्यायात ३९ व्या श्लोकात रावणाला मिळालेल्या शापाचे वर्णन आढळते. त्यात दिलेल्या पौराणिक कथेनुसार, रावणाने भगवान शिवशंकराची आराधना केली आणि त्यांना प्रसन्न करून घेतले. त्यांच्याकडून वर प्राप्त झाल्यावर रावण अधिकच शक्तिशाली बनला. तो त्रैलोक्यावर राज्य करायला निघाला. स्वर्ग लोक काबीज करायला निघालेला असताना तो आपला भाऊ कुबेर याच्या राज्यावर स्वारी करू पाहत होता. वाटेत त्याला रंभा नावाची अप्सरा दिसली. रंभा ही केवळ अप्सरा नव्हती तर कुबेरांची होणारी सून आणि कुबेर पुत्र नलकुबेर याची होणारी पत्नी होती. रंभेला पाहताच मोहित झालेला रावण तिला वश करण्याचे प्रयत्न करू लागला. रंभेने त्याला हटकल...