सई ताम्हणकर लवकरच पंकज त्रिपाठी सोबत एका हिंदी चित्रपटा मध्ये दिसणार आहे.
सई ताम्हणकर ही मराठी इंडस्ट्री मधील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे, तीने खूप सार्या गाजलेल्या चित्रपटा मध्ये काम केले आहे. दुनियादारी, टाइम प्लीज, तू ही रे, प्यार वाली लव स्टोरी हे चित्रपट प्रेक्षकाना खूप आवडले आहे व तिच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले होते.
सई ताम्हणकरणे हिंदी चित्रपट मध्ये देखील अभिनय केला आहे. हंटरर, लव सोनिया व 'गजनी' सारख्या बॉलिवूड चित्रपटांसह उत्कृष्ट अभिनय केला आहे. तिच्या चांगल्या अभिनयाने ती कॅमेऱ्यासमोर प्रेक्षकांना भुरळ घालत राहते. अन आता तिने कृती सॅनन आणि पंकज त्रिपाठी अभिनीत 'मिमी' या चित्रपटा मध्ये काम करीत आहे.
सई ने तिच्या चाहत्यांन साठी काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्राम वर कृती सॅनन सोबत चा एक फोटो Peek-A-Boooooo!!! असे लिहून शेअर केला होता.
'मिमी' हा चित्रपट 2020 मध्ये चाहत्यांच्या भेटीसाठी येत आहे, या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले असून यापूर्वी त्याने लुका चप्पी यां चित्रपटचे दिग्दर्शन केले होते. यात कृर्ती सॅनन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
२०१० मध्ये आलेला ' मला आई व्हायचय ' या मराठी चित्रपटाने २०११ साली मराठीतील सर्वोत्कृष्ट फीचर चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही जिंकला आहे. आणि याच चित्रपटाची प्रेरणा घेऊन 'मिमी' या चित्रपटाची कथा लिहिली आहे, मिमी यात पंकज त्रिपाठी यांनी मुख्य भूमिका साकारली असून, याची निर्मिती दिनेश विजानच्या मॅडॉक फिल्म्स आणि जिओ स्टुडिओद्वारे केली जाणार आहे.
हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे, कोरोना महामारी मूळे हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित केला जाणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा